आयर्लंडची चिमुकली सारा लुसी ओकॉन्नरने नासाला नाराज होऊन एक पत्र लिहिले.सारा या पत्रात लिहिते की ‘मी एक गाणे ऐकत असते त्या गाण्यात शेवटची ओळ ‘प्लुटोला परत आणा’ अशी आहे आणि मला असे खरच वाटते की असे व्हावे. ‘मी एका व्हिडिओमध्ये पाहिले होते की आपल्या सौरमालेतील सर्वात शेवटचा ग्रह प्लुटो आहे आणि दुसऱ्या व्हिडिओत प्लुटोला कचऱ्याच्या टोपलीत दाखवण्यात आला आहे. तो पृथ्वीला घाबरलेला दाखवण्यात आला आहे. असे कोणालाही किंवा कोणत्याही ग्रहाला कचऱ्याच्या टोपलीत टाकू नये, असे मला वाटते. माझ्यासाठी हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल.’ यावर नासा विभागाचे प्रमुख जेम्स ग्रीन यांनी तिच्या या पत्राला उत्तर दिले. ते लिहितात ‘मी तुझ्याशी सहमत आहे. प्लुटो हा कूल आहे. प्लुटोला ह्रदय आहे याच्यावर कोणाचा विश्वास बसेल का? माझ्या दृष्टीने प्लुटो ग्रह आहे का लघू ग्रह हे महत्वाचे नाही तर प्लुटो ही अशी अद्भुत जागा आहे ज्याचा आपण अजून अभ्यास करयाला हवा. मला आशा आहे की तु नक्की एखादा ग्रह शोधून काढशील. जर तु चांगला अभ्यास केलास तर एक दिवस नक्की आपण नासात भेटू.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews